Hot Posts

6/recent/ticker-posts

मंदिरावरून राजकीय धमासान! हिंदूत्ववादी म्हणवणारे पक्षच आपसात भिडले, प्रकरण काय?

 

Special Story: मंदिरावरून राजकीय धमासान! हिंदूत्ववादी म्हणवणारे पक्षच आपसात भिडले, प्रकरण काय?

 

मिरा भाईंदर शहरात एका हनुमान मंदिरावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. खाजगी जागेत असलेल्या श्याम भवन या धोकादायक इमारतीच्या पुनर्निर्माणासाठी  इमारत तोडण्यात आली. त्यावेळी मंदिर देखील तोडण्यात येणार असल्याच्या बातम्या पसरल्या. मंदिराच्या संरक्षणासाठी मंत्री प्रताप सरनाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना  यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. शिवसेना मनसेने तर मंदिर संरक्षणार्थ महा आरतीचे आयोजन देखील केले आले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडू लागल्या आहेत. तर दुसरीकडे जागा मालक यांनी हा वाद निरर्थक असल्याचे म्हणत आम्ही इमारत आणि मंदिराचे योग्य पुनर्वसन करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मंदिराचा वाद पेटवून जो तो आपल्या राजकीय पोळ्या बाजूला लागला आहे का ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.  



भाईंदर पूर्वेला बीपी रोडवरील श्याम भवन या  इमारतीचे रीडेव्हलपमेंटचे काम होणार आहे. या बिल्डिंगला लागून असलेल्या खाजगी जागेत हनुमान मंदिर आहे. इमारत धोकादायक असल्याने तोडण्यात आली असल्याची माहिती मेहता यांनी दिली.  मंदिर तोडून मेहता यांचे परिचित जमीनमालक मंदिर नवीन बांधणार आहेत. मात्र आमदार नरेंद्र मेहता हे या ठिकाणी दुकानाचे गाळे बांधण्यासाठी जर मंदिर तोडत असेल तर प्रताप सरनाईक ते होऊ देणार नाही अशी भीम प्रतिज्ञाच मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या संरक्षणासाठी त्यांनी महाआरती देखील घेतली आणि या वादाची ठिणगी पेटली.

Post a Comment

0 Comments