Hot Posts

6/recent/ticker-posts

BHARAT NEWS MARATHI-डहाणूतील नवीन वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन

 

मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या हस्ते लोकार्पण 

डहाणू : प्रतिनिधी

    डहाणूत नव्याने उभारण्यात आलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या लोकार्पण सोहळ्यास जिल्हाभरातील वनक्षेत्रपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल तसेच वन विभागातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.

    डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या नवीन वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक (डहाणू) निरंजन दिवाकर, उपवनसंरक्षक (कांदळवन कक्ष, मुंबई), मधुमिता एस., सहाय्यक वनसंरक्षक (कासा) प्रियंका पाटील आणि वनक्षेत्रपाल (डहाणू) नवीन माच्छी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

    कार्यक्रमा दरम्यान मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी नवीन कार्यालयाच्या सुसज्ज बांधकामाचे कौतुक केले. त्यांनी अशी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त कार्यालयीन इमारत प्रत्येक ठिकाणी असणे आवश्यक असल्याचे सांगत, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्षमतेने काम करण्याचे मार्गदर्शन केले.

    या लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी डहाणू वनक्षेत्रपाल नवीन माच्छी यांनी विशेष परिश्रम घेतले. नव्याने उभारण्यात आलेल्या या कार्यालयामुळे वन विभागाचे कामकाज अधिक परिणामकारकपणे पार पडण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments