जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्याने जव्हार पोलिस ठाण्याच्या वतीने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून पोलिस वर्गासह नागरिकांनी राष्ट्रएकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश दिला.
या मॅरेथॉनची सुरुवात हनुमान पॉईंट येथून झाली. अंबिका चौक, अर्बन बँक, पाचबत्ती नाका, मोर्चानाका, साकीनाका, जांभूळ विहीर मार्गे धाव घेत सहभागी स्पर्धकांनी सुमारे पाच किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला. विविध वयोगटातील सुमारे ५०० ते ६०० नागरिकांनी उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
स्पर्धेपूर्वी सर्व स्पर्धक, स्वयंसेवक आणि पोलीस जवानांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. या प्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये व उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर उपस्थित होते. मॅरेथॉनमधील महिला व पुरुष गटातील विजेत्यांना आमदार भोये आणि अधिकारी महेर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी आरोहन संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेच्या स्वयंसेवकांनी मार्गदर्शन, समन्वय आणि व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण स्पर्धा भव्य आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडली. एकता आणि राष्ट्रभावना बळकट करणारा हा उपक्रम जव्हार पोलिस ठाण्याने आदर्शवतरीत्या साजरा केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोहन संस्थेचे स्वयंसेवक, स्थानिक नागरिक आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
0 Comments